25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ काचेवानी रेल्वे फाटकवरील ओव्हर ब्रिजच्या कामाकरिता ना हरकत द्या – अन्यथा आंदोलन...

काचेवानी रेल्वे फाटकवरील ओव्हर ब्रिजच्या कामाकरिता ना हरकत द्या – अन्यथा आंदोलन करणार

0
125

आमदार रहांगडाले यांनी दिले रेल्वे विभागाला पत्र
तिरोडा :– हावडा मुंबई रेल्वे मार्गावर तिरोडा गोंदिया मार्गावरील काचेवानी रेल्वे फाटक LC.No. 518 कि.मी.१०२४/११-१३ येथे मागील ३ वर्षापासून ओव्हरब्रिज मंजूर आहे परंतु सदर कामाकरिता रेल्वे विभागातर्फे ना-हरकत प्राप्त न झाल्यामुळे सदर ओव्हर ब्रिजचे काम राष्ट्रीय महामार्ग्त नागपूर विभागातर्फे सुरु करण्यात आले नाही. याबाबत आमदार यांनी स्वतः११ मार्च २०२५ ला स्वतः राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता नागपूर विभाग व रेल्वे विभागाचे तांत्रिक अधिकारी यांचेसोबत बांधकामास्थळी भेट दिली असता येत्या ३ महिन्यात सदर काम सुरु करण्याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व रेल्वे विभागाचे तांत्रिक कर्मचारी यांचेशी बैठक घेऊन वरिष्ठांशी बोलून सदर पुलाचा मार्ग मोकळा करुन देण्याबाबत भेटीदरम्यान आपल्या विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांना कळविले होते. सदर रेल्वे महामार्गावर सद्यास्थितीत तिनही रेल्वेलाईन सुरु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे गाड्या तसेच मालगाड्यांचे आवागमन होत असल्याने एक ते दीड तास काचेवानी रेल्वे मार्गावरील रेलवे फाटक बंद असल्यामुळे प्रचंड प्रमाणात सामान्य नागरिक, रुग्णाना वाहुण नेणारी अंबुलेंस, शासकिय कर्मचारी व तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असून सदर रेल्वे फाटकवरील ओव्हर ब्रीजचे काम सुरु न झाल्यामुळे लोकप्रतिनधींविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. यासंबधीत कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर विभाग यांनी आपणाकडे पत्र्यव्यवहार करुनही आपणांकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर प्राप्त होत नसल्यामुळे व बांधकामाची परवानगी होत नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे काचेवानी ओव्हरब्रिजचे काम सुरु होऊ शकत नसल्यामुळे पुढील एक महिन्याच्या आत तिरोडा गोंदिया मार्गावरील (हावडा मुंबई रेल्वे) काचेवानी रेल्वे ओव्हर ब्रीज (Lc. No. ५१८ कि.मी.१०२४/११-१३) चे काम सुरु करण्याकरिता पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मे महिन्यामध्ये पहिल्या आठवडयात रेल रोको आंदोलनाची भुमिका घेण्यात येईल असे आशयाचे पत्र रेल्वे विभागाला आमदार यांनी दिले आहे.