26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ सिंधी भाषा दिनानिमित्त गोंदियात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सिंधी भाषा दिनानिमित्त गोंदियात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0
38

गोंदिया, 11 एप्रिल — सिंधी भाषा दिनाच्या निमित्ताने गोंदिया येथे पूज्य सिंधी जनरल पंचायततर्फे सिंधी स्कूलच्या प्रांगणात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये सिंधी भाषा, संस्कृती व परंपरांची माहिती लेखिका तमन्ना यांनी उपस्थितांना दिली.यावेळी प्रसिद्ध गायिका लता भक्तानी यांनी आपल्या मधुर आवाजात रंगारंग कार्यक्रम सादर केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले आणि उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी  डॉ. मंगेश गोदावले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणात सिंधी भाषेच्या जतन व संवर्धनाची गरज अधोरेखित करत अशा कार्यक्रमांचे कौतुक केले तसेच सिंधी समाज हा मिलनसार व कर्तृत्ववान समाज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी  डॉ. मंगेश गोदावले यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सिंधी समाजातील नागरिक उपस्थित होते.
सिंधी भाषा दिनाचे महत्त्व
सिंधी भाषा दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 1967 साली सिंधी भाषेला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत स्थान मिळाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, जो सिंधी समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
हा दिवस सिंधी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरांच्या जतन आणि संवर्धनासाठी समर्पित असून विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या मातृभाषेशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात भाषा व संस्कृतीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा तसेच पुढील पिढीला आपल्या परंपरेशी जोडण्याचा संदेश देण्यात आला.शेवटी, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष दरयानोमल आसवानी यांनी सर्वांचे आभार मानले.