27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ तिरोडा शहराच्या विकासासाठी सिटी सर्वेला गती द्या-आ.रहागंडाले

तिरोडा शहराच्या विकासासाठी सिटी सर्वेला गती द्या-आ.रहागंडाले

0
153

तिरोडा,दि.१२-: शहराच्या नियोजनबद्ध व सर्वांगीण विकासासाठी सिटी सव्है प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने येथील नगर परिषदेत गुरुवारी (ता. ९) एक महत्त्वपूर्ण बैठक आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील मालमत्ता नोंदी अधिक स्पष्ट, अचूक व सुसूत्र करण्यासाठी सिटी सर्व्हे ही अत्यंत आवश्यक प्रक्रिया असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी अधोरेखित केले. नागरिकांच्या मालकी हक्कांचे संरक्षण, शासकीय नोंदींची अचूकता व भविष्यातील विकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी सिटी सव्र्व्हेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान शहरातील सध्याच्या सर्व्हे स्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.यावेळी नगराध्यक्ष अशोक असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, सभापती देवेंद्र तिवारी तसेच लिटल फ्लावर शाळेचे मुख्याध्यापक रोहित प्रामुख्याने उपस्थित होते.