30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ सौर पंप योजनेच्या शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

सौर पंप योजनेच्या शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

0
50

भंडारा,दि.१४- महावितरण कडून भंडारा जिल्ह्यात प्रत्येक उपविभागनिहाय सौर कृषी पंप संदर्भातील तक्रार निवारण करण्यासाठी दिनांक १५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सौर कृषी पंप कार्यरत नसणे, पूर/माकड/ईतर कारणामुळे पॅनल किंवा पंप चे नुकसान, सोलर पॅनल किंवा पंप चोरीस जाणे, पाणी उचल प्रणाली कार्यरत नसणे, संपूर्ण रक्कम भरूनही पंप बसलेला नसणे व आदी तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांनी शिबिरास उपस्थित राहताना आपला लाभार्थी क्रमांक व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या प्रकरणावर त्वरित कार्यवाही करता येईल.
अद्यापपर्यंत महावितरणमार्फत भंडारा मंडळात कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून ५७९१ सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. बुधवारी १५ एप्रिल रोजी भंडारा (ग्रामीण) व तुमसर उपविभाग कार्यालयात, १६ एप्रिल गुरुवार रोजी पवनी, लाखनी व लाखांदूर उपविभागात तर शुक्रवार १७ एप्रिल रोजी मोहाडी, साकोली उपविभागात शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिरात संबंधित अधिकृत एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित राहणार असुन, ग्राहकांना त्यांच्या समस्यांबाबत थेट संवाद साधण्याची व तात्काळ मार्गदर्शन मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे ग्राहकाच्या अडचणीचे निराकरण एकाच ठिकाणी, सुलभतेने करण्यात येणार आहे.