28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक मानव विकास अंतर्गत सायकल वितरणचा दुसऱ्या टप्प्याचा निधी लवकरच मिळणार-शिक्षणाधिकारी महामुनी

मानव विकास अंतर्गत सायकल वितरणचा दुसऱ्या टप्प्याचा निधी लवकरच मिळणार-शिक्षणाधिकारी महामुनी

0
49

मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत विविध समस्यांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे सोबत सकारात्मक चर्चा
चित्रा कापसे/तिरोडा-मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना सायकलची वितरण होत असते त्यात पहिला टप्पा साडेतीन हजार रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले असून दुसरा टप्पा अजून पर्यंत प्राप्त झालेला नव्हता तो निधी आता प्राप्त झाला असून लवकरच वितरित होणार आहे असे आश्वासन जिल्हा परिषद गोंदियाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाला सकारात्मक चर्चा करते वेळेस आश्वासन दिले

तसेच शिष्टमंडळाच्या वतीने ए टू के असिसमेंट करिता निधी तसेच जी पी एफ च्या पावत्या मागील चार-पाच वर्षापासून कर्मचाऱ्याला मिळालेले नसल्याचे निदर्शनात आणून दिले त्यावर वेतन पथक अधीक्षक यांना मी बोलणार असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळांना दिले.

हे शिष्टमंडळ मुख्याध्यापक संघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष धनराज हुकरे यांच्या नेतृत्वात विदर्भाचे संघटन सचिव प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे, माजी जिल्हाध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले, विदर्भाचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी डी एस बहेकार ,महेंद्र मेश्राम, एम जी भुरे, बी जी बीसेन, बी एम मालधे ,एस बी दुबे, व्ही झेड गिर्हेपुंजे ,के एस वैद्य, एन एस मेश्राम,डी यू ठाकूर ,व्ही डी बारापात्रे ,पी एस चौरागडे, कुमारी एस डी बघेले या सर्व मुख्याध्यापकांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता.

मुख्याध्यापक संघाचे शिष्टमंडळ माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना भेटण्यापूर्वी जानकीदेवी चौरागडे हायस्कूल गोंदिया इथं कार्यकारिणीची सभा घेऊन विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि हे मुद्दे आपण माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांचे निदर्शनाचा आणून दिले पाहिजे तसेच आपण निवेदन दिले पाहिजे यावर चर्चा होत असतानाच कल करे से आज या सूत्रानुसार आत्ताच आपण शिक्षणाधिकारी यांच्या दालनात जाऊन आपल्या समस्या मांडाव्यात असे विचार येतात सर्वानुमते शिष्टमंडळ घेऊन जाण्याचे ठरले व सभा संपवून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने सकारात्मक चर्चा घडवून आणली. या सभेचे संचालन प्रमोद चौरागड तर आभार आभार प्रदर्शन बी जी बीसेन यांनी केले यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.