25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ भारतीय राज्यघटनेत आहे ओबीसीना राजा बनविण्याचा मार्ग-महेंद्र सिंग लोधी यांचे प्रतिपादन

भारतीय राज्यघटनेत आहे ओबीसीना राजा बनविण्याचा मार्ग-महेंद्र सिंग लोधी यांचे प्रतिपादन

0
49

गोंदियात डॉ आंबेडकर जयंती उत्साहात.
गोंदिया ता.21: शूद्र म्हणून जाती जातीमध्य विखूरलेल्या OBC समाजाने शिक्षणाचा अंगीकार करावा, कारण भारतीय राज्यघटनेत OBC साठी राजा बन ण्याचा मार्ग प्रशस्त आहे.असा ठाम विश्वास मध्यप्रदेशचे OBC नेते महेंद्र सिंग लोधी यांनी व्यक्त केला . श्री लोधी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे हे होते. मंचावर भाईचारा समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना महेंद्र सिंग म्हणाले की,डॉ. आंबेडकर जयंतीचा मंच,गुलामी करणाऱ्याला या देशाचा मालक बनण्याचा मंत्र शिकवतो.भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 340 हे आमचे भाग्यविधाता आहे.हा 340 वाला समाज कधीतरी जागेल अशी अपेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती.तेव्हा आपल्या हक्कासाठी लढावयाचे सोडून OBC समाज धार्मिक कथा कहाण्यात अडकला जात आहे.OBC समाजाला संगठीत होण्याचा आग्रह धरून महेंद्र सिंग पुढे म्हणाले की, सन 1971 पासून OBC ची जणगणणा झाली नाही, परंतु या देशात पशु पक्ष्याची आणि जनावरांची गणणा होत आहे.एकदा जणगणना झाली तर चाळीस हजार उपजातीच्या OBC समाजाला 65 टक्के आरक्षण मिळेल.जे जातीची पूजा करतात तेच आरक्षणाचा विरोध करतात.OBC समाजाला आरक्षण म्हणजे काय, हेच माहिती नाही.यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.केंद्र सरकार RSS च्या ताब्यात आहे असे सांगून महेंद्र सिंग पुढे म्हणाले की आमच्या अधिकारांचा विरोध कोण करतो हे ओळखण्याची गरज आहे.340 वाला OBC समाज कधीतरी जागा होईल अशी अपेक्षा करुण मध्य प्रदेश राज्य OBC चा जागृती केंद्र बनेल अशी प्रतिज्ञा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की बहुजन समाजावरील शैक्षणिक क्षेत्रात अन्याय दूर करण्यासाठी UGC आहे.
याप्रसंगी भाईचारा समितीचे सत्कार मूर्तीनी आंबेडकरी विचाराशिवाय भारताला पर्याय नाही असे बोलून दाखविले . जयंती समितीचे अध्यक्ष श्री भावे यांनी जयंती समितीच्या कार्याचा याप्रसंगी गुण गौरव केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन जयंती समितीचे महासचिव डॉ अश्विन खांडेकर यांनी केलं.जयंतीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळ पासूनच लोकांनी गर्दी जमविली होती. शहरातील विविध मार्गाने गमन करुण विविध देखाव्यानी मिरवणुका निघाल्या. आंबेडकरी विचारला साजेसे असे पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. दरम्यान आगंतुकांना वितरित करण्यासाठी ताक, नाष्टा, फळे, आणि थंड पेयाची स्टॉल्स उभारण्यात आले.जयंतीचे कार्यकर्ते आज सकाळ पासूनच अभिवादन कार्यक्रमात उपस्थित झाले होते. कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने किशोर रामटेके (कोषाध्यक्ष), अंकुर गजभिये (सचिव), राजश्री गोंडाने (संयोजक), दिनेश उके (उपाध्यक्ष), पंकज वासनिक, विलास वासनिक, सुनील मेश्राम, अनंत टेम्भुनीकर, सुशील गणवीर, नानाजी शेन्डे, सुनील भरने, पृथ्वीराज कोल्हटकर, आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.