27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक न एम एम एस परीक्षेत भिरावमजी विद्यालय वडेगावने घेतली गगन भरारी

न एम एम एस परीक्षेत भिरावमजी विद्यालय वडेगावने घेतली गगन भरारी

0
141

चित्रा कापसे/तिरोडा- एन एम एम एस परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा सराव हा जास्त प्रमाणात झाला पाहिजे.त्यासाठी शिक्षकांनी नियोजन करणे गरजेचे आहे .एन एम एम एस परीक्षेचा अभ्यासक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण झाल्यास सराव करिता पुरेसा अवधी मिळू शकतो, त्यासाठी अभ्यासक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे गरजेचे आहे .ते मी एक सभा घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देऊन नियोजन करून घेऊन अंमलबजावणी करण्यास लावणार आहे, जेणेकरून आपल्या गोंदिया जिल्ह्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे भेट दिली असता व्यक्त केले .यावेळी उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे व प्रतिभा शिक्षण संस्थेचे सचिव पंकज चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

भिवरामजी विद्यालय वडेगाव ही एन एम एम एस परीक्षेत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण करणारी शाळा ठरली असून शाळेने याबाबत गगनभरारी घेतलेली दिसून येते. याकरीता विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे यांचा उत्कृष्ट नियोजनाबाबत तर विषय शिक्षक जी एन बीसेन ,एस पी भगत, ए बी राठोड यांचा विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या परिश्रमाबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक सुधीर महामुनी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .मला अशा शिक्षकांची गोंदिया जिल्ह्यात एक टीम तयार करायची आहे. असे गौरवोद्गार ही याप्रसंगी शिक्षणाधिकारी महामुनी यांनी काढले.याप्रसंगी जे सी लांजेवार ,आर एस मेश्राम, यस पी टेंभरे, उत्कर्ष बोरकर ,नंदा बोरकर, विवेक बन्सोड ,गायत्री बिसेन, नामदेव अटकुलवाड, एस के कटरे ,अनिता उपरीकर, व्ही व्ही मेश्राम संगीता वालदे, विनोद धावडे प्रामुख्याने उपस्थित होते.