26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक श्री लक्ष्मणराव मानकर डी.एल.एड. महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

श्री लक्ष्मणराव मानकर डी.एल.एड. महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

0
22

आमगाव (प्रतिनिधी):स्थानिक श्री लक्ष्मणराव मानकर डी.एल.एड. महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा विशेष कार्यक्रम भक्तिमय व प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गुरुपूजन व दीपप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य एन. के. काथलेवार सर यांनी भूषविले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुंचे ज्ञान, संस्कार आणि जीवनातील महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सर्व उपस्थितांनी गुरुजनांना वंदन करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गुरू हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रेरणास्त्रोत”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य एन. के. काथलेवार सर म्हणाले, “गुरू हे ज्ञान, संस्कार आणि मूल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवितात. विद्यार्थ्यांनी गुरूंचा सन्मान राखून निरंतर ज्ञानार्जनाचा ध्यास घेतला पाहिजे.”