26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ लाखनी येथे २ दिवसीय कार्यशाळा, स्वप्नपूर्ती संस्था आणि समर्थ महाविद्यालयाचा उपक्रम

लाखनी येथे २ दिवसीय कार्यशाळा, स्वप्नपूर्ती संस्था आणि समर्थ महाविद्यालयाचा उपक्रम

0
88

“उत्तम शिक्षणासह विविध प्रकारचे कौशल्य आपल्या अंगी असणे आवश्यक”

लाखनी:उत्तम शिक्षणासह विविध प्रकारचे कौशल्य आपल्या अंगी असणे आवश्यक आहे. जितके अधिक कौशल्य असतील तितके तुम्ही प्रभावी ठरू शकता, असे प्रतिपादन लाखनीच्या तहसीलदार शीतल घावटे यांनी केले. तर २१ व्या शतकात विविध कौशल्य असलेल्या लोकांना पुढे जाण्यासाठी यशाचा राजमार्ग लवकर सापडतो, असे प्रतिपादन डॉ. दिगंबर कापसे यांनी केले. लाखनी येथे स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्था, लाखनी आणि समर्थ महाविद्यालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य आणि वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होत्या. याप्रसंगी उद्घाटक म्हणून तहसीलदार शीतल घावटे तर अध्यक्षस्थानी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे होते. जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्या स्वाती वाघाये, स्वप्नपूर्ती बहुद्देशीय संस्थचे सचिव सुधीर काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

२ दिवसीय कार्यशाळेदरम्यान संभाषण कौशल्य, वक्ता म्हणून सादर होताना, व्यक्तिमत्व विकास आणि सूत्रसंचालन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आली होती. सोबतच प्रशिक्षणार्थ्यांसाठी सराव सत्र देखील होते. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये, उत्तम वक्ते प्रथमेश तेलंग, मुख्याध्यापक अंगेश बेहलपांडे, व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक विशाल हटवार यांनी या चारही विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी आणि सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव डॉ. चंद्रकांत निंबार्ते आवर्जून उपस्थित होते. कार्यशाळेतील सहभागी प्रशिक्षणार्थींचा गौरव करत असताना असे उपक्रम सर्वच स्तरातील लोकांसाठी महत्वाचे असल्याचे नमूद केले. या कार्यशाळेला डॉ. मुक्ता आगाशे, अंजना पिंपळशेंडे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संयोजक विशाल हटवार, भीष्म लांडगे, लिखित पुडके, दुर्गेश टिचकुले, नितेश टिचकले, मिनाक्षी सिंगणजुडे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच समर्थ महाविद्यालय प्रशासन, संजय वणवे, प्रा. अजिंक्य भांडारकर यांचे मौल्यवान सहकार्य लाभले.