गोरेगाव,दि.२२-तालुक्यातील गणखैरा स्थित किरसान इंटरनेशनल पब्लिक शाळेच्या इयत्ता दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . त्यामध्ये सीबीएसई दहावी बोर्ड परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी दिक्षा सुर्यवंशी ९६.२० टक्के प्रथम , हर्षा हुंडरा ९१.२० टक्के व्दितीय, कंचन प्रधान ८९.८० टक्के तृतिय, धारनी बिसेन ८९.४० टक्के, नैतिक डोनोडे ८८.६० टक्के, पलक पटले ८७.०० टक्के , किंजल धाडे ८६.८० टक्के , आयुष्य मंदरे ८६.६० टक्के , भुमी प्रजापती ८६.२० टक्के , सायली शेंडे ८५.८० टक्के, वैभव डागा ८५.२०.टक्के , खुशबू उईके ८१.८० टक्के , दिव्या भोयर ८१ २० टक्के, यमन नागपुरे ७९.८० टक्के , ममता पुजारी ७७.२० टक्के , सेफाली चौधरी ७६.८०टक्के , इशिका ताराम ७६.८० टक्के, रोशनी धुर्वे ७६.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचे व्यवस्थापकीय संचालिका सिमा किरसान मॅम आणि प्राचार्य अनिल कुमार राव सर यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थांनां पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक एड. दुष्यंत किरसान सर यांनी यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी शाळेचे , आपले व पालकांचे नाव लौकीक केले.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि आईवडीलांना दिले आहे.





