सडक अर्जुनी २४ एप्रिल:: ग्रामीण प्रशासनाचा पाया मजबूत करणारी ग्राम पंचायत ही संस्था गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असते. त्यामुळे ग्राम पंचायत भवन हे केवळ एक कार्यालय नसून ग्रामविकासाचा खरा कणा आहे. असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील गिरोला येथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत भवन बांधकाम योजना अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा मार्गदर्शन करताना आ. बडोले बोलत होते.भवन बांधकामाचे भुमिपूजन आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. ता. २१ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच उमराव कापगते होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एम. खोटेले, डॉ. अविनाश काशिवार, उपसरपंच ओमप्रकाश लंजे, ग्रामपंचायत अधिकारी कामेश ठलाल, ग्रामपंचायत सदस्य दुधराम कापसे, राजेंद्र पाखमोडे, भूमिता जांभूळकर, प्रमिला तागडे, वि. स. सोसायटीचे अध्यक्ष भैय्यालाल पुस्तोडे, माजी सरपंच श्रीराम पुस्तोडे, मंगला बांगरे तसेच गावातील आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला. नवीन ग्रामपंचायत भवन उभारल्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत गिरोला यांच्या वतीने करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांचे आभार मानून समारंभाची सांगता करण्यात आली.





