गोंदिया २४ एप्रिल: जिल्ह्यात अवैध धंदे तसेच अवैध शस्त्र बाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्ती असतांना स्थानिक नेहरू चौक परिसरात एक इसम संशयास्पदरित्या वावर असल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. दरम्यान त्या युवकाचा ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळून विना परवाना पिस्टल व दोन जीवंत काडतुस पोलिसांनी हस्तगत करून आरोपीला अटक केली. शुभम पुरुषोत्तम हरदिये (२८) रा. बाजपेई चौक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, २२ एप्रिल रोजी स्थागुशाचे पथक गस्ती असतांना तसेच संबंधित युवकाची माहिती मिळाल्याच्या आधारावर शोध घेत असतांना नेहरु चौक चे जवळ जनता पावभाजी समोरिल मार्गावर संशयित इसमाने पोलीसांना पाहुन त्याचे कमरेतुन एक पिस्तुल काढुन बाजुला असलेल्या कपड्याच्या दुकानात लपविली. त्यानंतर पोलिसांनी इसमास ताब्यात घेवुन त्याला ताब्यात घेतले. दरम्यान शुभम पुरुषोत्तम हरदिये असे सांगितले व त्यास पोलीसांना पाहुन कपडयाच्या दुकानात काय लपविले आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. कपडा दुकानदार विचारणा केली असता त्याने वस्तु लपवून ठेवल्याची कबुली दिली. दरम्यान झडती घेण्यात आल्यावर कपडा दुकानाचे ठेल्यावर खरड्याच्याखाली एक देशी बनावटीचे लॉखडी पिस्टल ज्यामध्ये २ राउंड लोड असलेली किंमत राउंडसह ५१ हजार मिळून आली. ती पंचासमक्ष कायदेशिररित्या आरोपीकडुन जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. स्टे. गोंदिया शहर पोलीस हे करीत आहेत.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. पुरुषोत्तम अव्हेरकर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु मिश्रा, पो. हवा. महेश मेहर, पो. हवा. सोमेन्द्रसिंह तुरकर, पो. हवा. संजय चौहान, पो. शि. संतोष केदार, पो. शि. राकेश इंदुरकर, पो. शि. विठ्ठले, चा. पो. शि. राम खंडारे यांनी केली आहे.





