34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा विभागस्तरिय सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवाचे बक्षिस वितरण समारोप

विभागस्तरिय सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवाचे बक्षिस वितरण समारोप

0
195

blank

सडक अर्जुनी,दि.२४ एप्रिलः– इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील विनाभन आश्रमशाळांचे विभागस्तरिय सास्कृतिक, काला महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथे करण्यात आले होते. यासाठी दामाजी पाटील लंजे माध्यमिक व अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी जि, गोंदिया येथील विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षक पाठविण्यात आले होते. सदर शाळेची निवड जिल्हास्तरावरुन करण्यात आली होती.
विभागस्तरिय कार्यक्रमाचे उद्‌घाटन सोहळा दिनांक २६ ते २८ डिसेंबर २०२५ ला पार पडला. या कार्यक्रमाचे उद्द्घाटक विजय वाकुळकर, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग नागपूर व डॉ. सचिन मडावी सहा संचालक, गडचिरोली तसेच विशेष अतिथी  किशोर भोयर, सहा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया हया मान्यवराच्या उपस्थीतीत पार पडला. सदर स्पर्धेमध्ये गोंदिया माध्यमिक आश्रमशाळा संघ खो-खो मध्ये मूली प्रथम क्रमांक व कबडडी मध्ये मूले प्रथम क्रमांक पटकावला. नाटक स्पर्धेमध्ये निशांत महवंत सयाम हया दामाजी पाटील लेजे माध्यमिक आश्रमशाळा सडक अर्जुनी जि. गोंदिया ने प्रथम क्रमांक पटकावला. पा मध्ये सुशांत बावणे, साहोल बिसेन, मोहील भोयर, विशाल मडावी, कु. भारती चौधरी, कु.राणी भोगारे, कु. नंदिनी नेवारे यांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाचे बक्षिस वितरण शाळेमध्ये अशोक लंजे, सचिव संजे शिक्षण संस्था, फुटाळा व संध्याताई लंजे, अध्यक्षा लेंगे शिक्षण संस्था फुटाळा / सौंदळ व मुख्याध्यापक के. के. पुस्तोडे, वाय. पी. बन्सोड प्राचार्य ओ. आर. बाय, कापगते सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व्हि. जी. गणविर, आर. एस. दोनोडे, एस.ए. राठोड, कू. जी. एम. गाबळ, एम.एन. गहाणे, पी.एच. गिन्ने, जे.टी. चिधालोरे, व्हि.पी. ओडे, कु.जे.टी. बुराडे, कि. जी. कोटांगाने.. बी. आर. मस्के, एम.एस. नेकाने ई. एस. देशमुख, वि.एस. निबेकर, डि.जी. भदाडे, व शिक्षकेत्तर कर्मचारी आर. एस. बाळबुध्देश्री. एस. सुर्यवंशी, एस. एस. कांबळे, ए. बी. फुल्लुके, एफ.ए. लटये. कु.जे.टी. नागलवाडे, व्हि. एफ. शेंडे, कु. ले. आर. जांभुळकर, एच. जी. पात्रे, बी. आर. मेश्राम, सी.सी. लांजेवार, एम.टी. हाडे, एस. पी. जतपेले उपस्थीतीत होते. काला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व विद्याथ्यांचे संपाचे व खेळाडुंचे टॉफी व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्याव्यांचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले.

blank