28.3 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ आयएएस डॉ. पंकज पटले यांचा सत्कार

आयएएस डॉ. पंकज पटले यांचा सत्कार

0
119

सडक अर्जुनी,दि.२४ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC)वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून भारतीय प्रशासकीय सेवा महाराष्ट्र IAS कॅडर ज्यांना नुकतेच प्राप्त झाले असे डॉ पंकज पटले यांचा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार व उपनगराध्यक्ष वंदना किशोर डोंगरवार शाल, भेटवस्तू आणि डायरी देऊन स्वागत व सत्कार केला. IAS डॉ पंकज पटले यांचे वडील मनोहर पटले हे जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक आहेत.

यावेळी बोलताना डॉ पंकज पटले IAS यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक यांना दिले.सोबतच “सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे हे यश मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले.यावेळी पद्मश्री डॉ परशुराम खुणे , जीवन म्हशाखेत्री ,रतन गणवीर, मनोहर पटले, आदित्य डोंगरवार उपस्थित होते.

शिक्षक परिवारातील मुलांचे नेत्रदीपक यश हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद-किशोर डोंगरवार
गोंदिया जिल्ह्य़ातील प्राथमिक शिक्षकांची मुले केंद्रीय लोकसेवा आयोग असो की राज्यसेवा आयोग या प्रत्येक स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत आहेत. जिल्हा परिषद शिक्षकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्र IAS कॅडर भेटून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. हे आमच्या प्राथमिक शिक्षकां साठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे यामुळे पुढे अनेक जिल्ह्यातील मुले प्रेरणा घेतील अशी अपेक्षा आहे.