25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदयातर्फे “उद्योजकतेकडे पहिले पाऊल” – अभिमुखता कार्यक्रम

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदयातर्फे “उद्योजकतेकडे पहिले पाऊल” – अभिमुखता कार्यक्रम

0
49

गोंंदिया,दि.२४ एप्रिलः येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदया येथील इन्क्युबेशन सेल व इन्क्युबेशन-कम-बझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गोंदया यांच्या संयुक्त विद्यमाने “फस्ट स्टेप इन्टू आंत्रप्रेन्युरशिप” या उद्योजकता अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन व प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यामध्ये स्टार्टअप्स, इन्क्युबेटस, नवोन्मेष व उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण करणे व त्यांना उद्योजकतेकडे करिअर पर्या म्हणून प्रोत्साहित करणे हे होते.प्रास्ताविकेत डॉ. स्नेहा जायसवाल, समन्वयक, इंक्युबॅशन सेल यांनी भारताला नव्या उत्पादनांची निर्मिती करणारे, उद्योग व समाजातील आव्हानांना सामोरे जाणारे सृजनशील पदवीधर आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमास संशोधन समतीचे प्रभारी डॉ. एम. व्ही. कावले, प्रो. वाई. एस. बोपचे, समन्वयक, बी.वोक. विभाग यांची प्रमुख उपिस्थती होती. मुख्य वक्ते दीपांशु टेंभरे, केंद्र समन्वयक, इन्क्युबेशन-कम-बझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गोंदया यांनी स्टार्टअप्स व इन्क्युबेशनची मूलभूत तत्त्वे स्पष्ट केली. त्यांनी नवीन कल्पना स्टार्टअपमध्ये कशा रूपांतरित करता येतात, इन्क्युबेटसची भूमिका व शासनाच्या निधी योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना उद्यमतेकडे प्रेरित केले. बी.वोक. विभाग संकाय सदस्य श्रीमती श्वेतल तिवारी,कु.भाग्यश्री मेश्राम,कु.गायत्री चिखलोंढे,श्रीमती अख्तर खान,युवरत्न देशकर तथा डॉ. सोनल वर्मा, सहायक प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग यांनी यशस्वीतेकरिता विशेष योगदान दिले.