35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता चंद्रपुरात तहसीलदारासमोरच शेतकऱ्याने केले विषप्राशन

चंद्रपुरात तहसीलदारासमोरच शेतकऱ्याने केले विषप्राशन

0
72

blank

चंद्रपूर: जमिनीचा ताबा घेण्यावरून सुरू असलेल्या वादातून एका शेतकऱ्याने चक्क नायब तहसीलदार आणि पोलिसांच्या ताफ्यासमोरच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी कोठारी येथे घडली. अरुण मारोती पारेलवार (५६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरणपायली (रिठी) येथे पारेलवार यांची वडिलोपार्जित जमीन आहे. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, शुक्रवारी कथित खरेदीदार तेजिंदर सिंग दारी हे पोलिसांचा मोठा ताफा, महसूल कर्मचारी आणि जेसीबीसह शेतात पोहोचले. कब्जावरून दोन्ही गटांत वाद असतानाच, कापूस पिकावर जेसीबी फिरवून पीक नष्ट करण्यात आले.

खरेदीदाराच्या अर्जावरून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांच्याकडे जमिनीबाबत असलेले पुरावे व कागदपत्रांची मागणी केली तो कोणतेही कागदपत्रे देऊ शकला नाही. त्यानंतर त्याने कीटकनाशक प्राशन केले. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू असून परिस्थिती स्थिर आहे. सध्या ताबा देण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
अजय मल्लेलवार, नायब तहसीलदार, बल्लारपूर

blank