नागपूर,दि.२६ः नागपूर जिल्हा बार असोसिएशन (DBA) च्या 2026 सालासाठीच्या निवडणुकीकरीता असोसिएशनने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 24 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडले.या निवडणुकीच्या निकालांची घोषणा आणि मतमोजणी 25 एप्रिल रोजी करण्यात आली.यात नागपूर जिल्हा वकील बार असोसिएशनच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदी एॅड विकास डी.कऱ्हाडे यांनी दणदणीत विजय मिळविला.एड.कऱ्हाडे यांनी आपल्या यशामागे आपले सर्व मित्र, सहकारी, ज्येष्ठ वकील बंधू-भगिनी तसेच हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य आणि आशीर्वाद असल्याचा उल्लेख केला आहे. 




