26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायतींच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग आवश्यक-जि. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

ग्रामपंचायतींच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग आवश्यक-जि. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
133

पंचायतराज सरपंच मेळावा उत्साहात
गोंदिया ता. 2६:- ग्रामपंचायतींच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभागाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.श्री भेंडारकर हे सडक अर्जुनी येथे आयोजित पंचायतराज सरपंच मेळाव्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते.
मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., उपाध्यक्ष सुरेश हर्षे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे, जिल्हा परिषदेचे सभापती डॉ. लक्ष्मण भगत, श्रीमती रजनी कुंभरे, श्रीमती दीपा चंद्रिकापुरे, पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, मुनेश रहांगडाले, तेजराम चव्हाण, आम्रपाली डोंगरवार, योगिता पून्डे, चित्रलेखा चौधरी, वीणा कटरे यांच्या सह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, सरपंच गंगाधर परशुरामकर,चंद्रशेखर बहेकार,तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कमलेश बिसेन उपस्थित होते.
श्री भेंडारकर पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक त्रिस्तरीय समित्यांच्या समन्वय्याने गावाचा विकास होतो. यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून भेंडारकर पुढे म्हणाले की,ग्रामपंचायतीला विविध कर आकारणीचा अधिकार आहे. ज्यामुळे गावातील रस्ते, पाणीपुरवठा,स्वच्छता, शाळा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होतो हा निधी 100% प्राप्त करण्यासाठी गावकऱ्यांनी मोलाची भूमिका साकार करावी.तसेच गावाचा विकास साधण्यासाठी सीएसआर कडून प्रसंगी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करा, ग्रामपंचायतीने मागणी केल्यास जिल्हा ग्राम विकास निधीतून कर्ज देण्यात येईल,असे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम म्हणाले की, ग्रामपंचायतींच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे यासाठी हा मेळावा आहे.ग्रामपंचायतीनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण )राबवून 65 हजार कुटुंबांचे घरकुल तय्यार झाले असून गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आला आहे.यावर त्यांनी ग्रामपंचायतिचे जोरदार कौतुक केले.गावात पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या निर्माण होऊ नये, सर्वांना पिण्याचे पुरेषे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करा.ते पुढे म्हणाले की, स्मशानभूमीच्या सौंदर्य करणासाठी प्रयत्न करण्यापेक्षा गावात वाचनालय निर्माण करुण अभ्यास करण्याची गरज आहे, असे सांगून त्यांनी भरणोली येथील एका वाचनालयाचे उदाहरण देऊन हे स्पष्ट केले.ते म्हणाले की,स्म्शानभूमीच्या विकासापेक्षा,ग्रामपंचातिला मिळणारा निधी हा 100 टक्के रस्ते, स्वच्छता,नाली, शाळा आणि पाणी यावर खर्च झाला पाहिजे.
उपाध्यक्ष हर्षे म्हणाले की, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ज़िल्हा परिषद तुमच्या पाठीशी आहे. त्यांनी सरपंचांना विकासाचे केंद्रबिंदू आहे असे सांगून सर्वांना सोबत घेऊन चाला या भावनेतून कार्य करुण गावाचा विकास करण्याचे आव्हान केले.डॉ लोखंडे यांनी सरपंचांनी कर्तव्यात कसूर करू नये यावर कायद्याची जाणीव करुण दिली.
याप्रसंगी बोलताना नागपूर येथील खुरसापार ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुधीर गोतमारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खेडेगाव स्वयंपूर्ण आणि मजबूत स्थितीत होते. परंतु आता विकासाची संकल्पना राजकीय पुढाऱ्यांनी निर्माण केली आहे. केवळ रस्ते, नाल्या हीच संकल्पना रूढ झाली आहे.ते पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जपान मधून पाच वर्ष कालावधीची संकल्पना स्वीकार करुण, ही पाच वर्षाची संधी सरपंचांना मिळाली आहे.या संधीचे सोने करा असे ते म्हणाले.
यावेळी भजियापार( ता. आमगाव )खोडशीवणी( ता. सडक /अर्जुनी )आणि भजेपार(ता. सालेकसा )येथील सरपंचानी तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विविध विषयांवार मार्गदर्शन केले.याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमच्या माध्यमातून माझी वसूंधरा आणि शेतकरी राजा यावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान कर्मचाऱ्यांचा सन्मान करुण प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
महापुरुषांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करुण, वंदेमातरम आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमांची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) एम. एम. वासनिक यांनी तर संचालन संख्यिकी अधिकारी वैशाली खोब्रागडे आणि शिक्षक सत्यवान गजभिये यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी आदित्य ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी एस. आय. वैद्य,सडक अर्जुनीचे दिलीप खोटेले,जयंत खोटेले, सी. आर. शहारे, वाय. सी. पटले,गुणवंत ठाकूर,ज्ञानेश्वर कानडे, श्यामराव समरीत, पृथ्वीराज कोल्हटकर, प्रकाश तिरेले, रोहित बनसोड, प्रकाश रहांगडाले, सुनील चव्हाण, दिलीप चौधरी,सुनील साखरे आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.