27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक प्रक्रियेची केली पाहणी

जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक प्रक्रियेची केली पाहणी

0
50

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

गोंदिया, दि.24 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज जिल्ह्यात सुरू असलेली महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली.गोंदिया जिल्ह्यातील 755 मतदार परिषदेकडे नोंदणीकृत मतदार आहेत. आज जिल्ह्यात असणाऱ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कक्षालागत असणाऱ्या कक्षात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या निवडणुकीच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. निवडणुकीची एकूण माहिती जाणून घेतली. मतदान झाल्यावर तात्काळ मतपेट्या मुंबईकडे रवाना केल्या जातील.रविवार सकाळी 8.00 वाजता ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.