तज्ज्ञाचे मार्गदर्शन,आकर्षक देखावे, आणि सांगित मैफल – जत्था वामनाचा
गोंदिया ता. 26 एप्रिल :– जगाला प्रज्ञा,शील, करुणेचा मार्ग दाखवून शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत शिद्धार्थ गौतम बुद्धांच्या 2589 व्या जयंतीची गोंदियात जय्यत तय्यारी सुरु झाली आहे. या जयंती कार्यक्रमाची सुरुवात 1 मे पासून होणार असून मुख्य कार्यक्रम दुसऱ्या दिवशी 2 मे रोजी होणार आहे.
हा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. समितीचे अध्यक्ष अरविंद भावे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 1 मे रोजी सकाळी बुद्धवंदना घेण्यात येईल. दरम्यान सायंकाळी आकर्षक देखाव्यांसह शहरात कार व दुचाकी द्वारे भव्य धम्म महा रॅलीचे परीभ्रमण करण्यात येईल. या रॅलीचा प्रारंभ येथील भीम नगर मैदानातून होणार असून श्री भावे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे, एन. के. शेंडे हे पंचशील झेंडा दाखवून रॅली प्रस्थान करण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी 2 मे रोजी मुख्य कार्यक्रमात बिलासपूरचे बहुजन चिंतक रमेश जटवार आणि श्रीमती अमृता मिलन मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी नगरसेवक सुनील भरणे, स्नेहा गडपायले (डॉली ), माजी अध्यक्ष अनंत टेम्भूरकर, बामसेफ चे सुशील बनसोड आणि संथागारचे प्रा. रोशन मडामे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सायंकाळी 7.00 वाजता औरंगाबादचे योगीराज आनंद हे भीम बुद्ध गीतांची संगीतमय मैफल जत्था वामनाचा सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अरविंद भावे (अथ्यक्ष), दिनेश ऊके (उपाध्यक्ष), डॉ अश्विन खांडेकर (महासचिव), अंकुर गजभिये (सचिव), श्रीमती राजश्री पुंजेकर (संयोजक), किशोर रामटेके (कोषाध्यक्ष) व जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.





