23.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ निवडणूक निरिक्षक जऱ्हाड यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

निवडणूक निरिक्षक जऱ्हाड यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

0
35

गोंदिया,दि.४ : भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरिक्षक ए.एल.जऱ्हाड यांनी आज गोंदिया येथे भेट देवून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचेशी विश्रामगृह येथे चर्चा केली. त्यानंतर श्री.जऱ्हाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या या निवडणूकीच्या मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली. आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. श्री.जऱ्हाड यांचेसमवेत यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, गोंदिया उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.