26 नोव्हेंबरला अर्जुनी मोरगावातून होणार जनचेतना यात्रेचा शुभारंभ

0
5

goregaon-obc-38 ते 11 नोव्हेंबरला तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन

गोरेगाव,दि.04-येथील जगत महाविद्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवार 4 नोव्हेंबरला गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी सेवा संघाच्या पार पडलेल्या सयुंक्त सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांनी आपल्या सर्व ओबीसींचा एकच लक्ष्य असायला हवे ते 8 डिसेंबरचा ओबीसी महामोर्चा याशिवाय दुसरीकडे सध्या आपली शक्ती खर्ची घालू नये असे आवाहन केले.आपल्या ओबीसीच्या महामोर्च्याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून हा महामोर्चा अयशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष मग ते सत्तेतील असो की विरोधी पक्षातील हे वेळप्रसंगी एकत्र येऊन आपल्या ओबीसी संघटनांच्या प्रमुखांच्या नावाने चुकीचा प्रचार करुन गैरसमज तयार करुन फूट पाडण्याचे षडयंत्र रचू शकतात.त्यामुळे आपण त्यांच्या अशा आमिषाला बळी न पडता आपण आधी ओबीसी आहोत नंतरच कुठल्या पक्षाचे पदाधिकारी,किंवा नेते हे लक्षात ठेवूनच सर्वांनी हेवेदावे बाजूला सारून ओबीसी म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हणाले.लाखोंच्या संख्येने आपला महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातून एक वाहनातून आपले पदाधिकारी,शेतकरी,कार्यकर्ते मोर्च्यामध्ये सहभागी करण्यासाठी तन मन धनाने पुढे यावे असे म्हणाले.

सभेला मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,संघटक जिवन लंजे,ओबीसी कर्मचारी शिक्षक आघाडीचे एस.यु.वंजारी,ओबीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष कैलास भेलावे, महासचिव मनोज मेंढे,रमेश ब्राम्हणकर,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,पी.डी.चव्हाण,अर्जूनी मोरगाव तालुकाचे बालू बडवाईक,गिरीश बागडे,ओमप्रकाश पवार,सडक अर्जुनीचे हरीश कोहळे,डी.आय.कटरे,कोरे,भुमेश्वर चव्हाण,सालेकसाचे मनोज डोये,श्री फुंडे,गोरेगाव तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण,शास्त्री वार्ड संघटनेचे अध्यक्ष खुशाल कटरे,बंशीधर शहारे,रामकृष्ण गौतम,श्री कुंभलकर,अनिरुध्द मेश्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी गोंदिया जिल्ह्यात ओबीसी महामोर्च्याच्या प्रसार प्रचारासाठी येत्या 26 नोव्हेंबरला सविंधान दिनाचे औचित्य साधून अर्जुनी मोरगाव येथ आयोजित ओबीसी मेळाव्यातून जनचेतना यात्रा सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर केले.अर्जुनी मोरगाव येथून सुरु होणारी जनचेतना यात्रा ही 8 डिसेंबरला नागपूर महामोर्च्यात सहभागी होणार असल्याचेही म्हणाले.त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हयातील सर्वच तालुक्यात नियोजनाच्या दृष्टीने मंगळवारला सडक अर्जूनी व गोरेगाव,बुधवारला तिरोडा व गोदिया ग्रामीण,गुरुवारला देवरी,सालेकसा व आमगाव आणि शुक्रवारला गोंदिया शहर व ग्रामीण याप्रमाणे बैठका आयोजित करण्यात आल्याची घोषणा करीत तालुका कार्यकारीणीने या बैठकांचे नियोजन करावे असेही त्यांनी सांगत या सर्वासांठी खर्च लागणार असल्याने सहकार्य निधी ओबीसी बांधवानी संघटनेला द्यावे असे आवाहन केले.याच बैठकीत गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये यांच्यावर चुकीच्या पध्दतीने लावलेल्या एट्रासिटीच्या  विरोधात शनिवारला जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी खेमेंद्र कटरे यांनी 27 नोव्हेंबरच्या महिला महाधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यातून अधिकाधिक महिलांना सहभागी करुन घेण्यासोबतच 8 डिसेंबरचा मोर्चा गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अधिक सहभागाने कशा गाजविता येईल यासाठी दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी नियोजन करुन सहकार्य करावे असे आवाहन केले. बैठकिचे  प्रास्तविक मनोज मेंढे यांनी केले.संचालन गोरेगाव तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तर आभार ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. डाॅ.संजीव रहागंडाले यांनी मानले.