23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक ९८ टक्के गुणांसह श्रद्धा गौतमची घवघवीत कामगिरी

९८ टक्के गुणांसह श्रद्धा गौतमची घवघवीत कामगिरी

0
303

गोंदिया, ८ मे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (८ मे) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात अर्जुनी मोरगाव येथील जी एम बी इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा योगेंद्र गौतम हिने ९८ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रद्धाने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच व्यवस्थापनाने तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.श्रद्धाच्या यशामुळे अर्जुनी मोरगाव परिसरात अभिमान व्यक्त केला जात असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

blank