29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक मानसीला डॉक्टर बनून करायचीय सेवा

मानसीला डॉक्टर बनून करायचीय सेवा

0
82

गोंदिया : इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण घेणारी स्थानिक गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी मानसी खेमराज बिसेन हिला डॉक्टर बनून गोरगरिबांची सेवा करायची असल्याचे सांगितले. तिची चुलत बहिणी डॉक्टर असल्याने आपल्यालाही डॉक्टर होऊन लोकांची मनोभावे सेवा करायची आहे. त्या दृष्टीने मी पुढे तयार करणार आहे.
आतापासूनच डॉक्टर होण्याची मी तयारी करीत आहे. मी दररोज चार तास अभ्यास करायची. त्यातच शिकवणी वर्गही लावला होता. वडील डोंगरगाव पार्डीबांध येथे शिक्षक असल्याने वडिलांकडून सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत होते. त्यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाल्याचे मानसी अभिमानाने सांगते. आम्ही दोन बहिणी असून, मी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे मानसीने सांगितले.

blank