देवरी,दि.०८- महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्यावतीने आज जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील शासकीय आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने १०० टक्के निकालाची परंंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे..प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांचे प्राचार्य कमल कापसे व माध्यमिक शिक्षक राजू भक्ता यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
१० वीच्या परीक्षेत बसलेल्या ३६ विद्यार्थ्यापैकी ३६ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु.कल्याणी ओमप्रकाश वल्के प्रथम व कु.राखी कैलास राठी द्वितीय आली.१९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. त्याचप्रमाणे इयत्ता बारावी विज्ञानाचा सुद्धा यावर्षी शंभर टक्के निकाल लागला असून त्यामध्ये विद्यालयातून प्रथम कु.शुभांगीनी शंकर हत्तीमारे व द्वितीय क्रमांक निशांत वीरेंद्र टेंभुर्णे आणि हंसज मनोजकुमार साखरे असून कला शाखेतून प्रथम कोमल प्रभुदास मेश्राम, द्वितीय खुशाली सावलराम आचले आहेत. परीक्षेचे उत्तम नियोजन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद याच्या मार्गदर्शनाखाली केले असुन यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य कमल कापसे तसेच शाळेतील शिक्षक राजू भक्ता,पी.पी. वंजारी,कु. एस आर मेश्राम,प्रा.व्ही.एन. खोंडे,प्रा.कु.व्ही.एन. नेणावत,प्रा.राजेश हट्टेवार, प्रा.संदीप बिसेन, प्रा.नितीन मेश्राम, प्रा.मेघा धोपटे, विजयकुमार टेंभरे, मोरेश्वर धवणे, सुरेखा कोरे,अधिक्षक अजय सोनुले, अधिक्षीका पौर्णिमा जोशी,ओमप्रकाश मडावी,आशा धुर्वे, अरविंद कुथीर, खेमराज नाईक,दुर्गेश उईके, मंदाताई देशमुख, प्रदीप होळी, मयूर राठोड, पूनम दाढे, जयदेव भांडेकर, दीपा लाडे व समस्त शाळेतील कर्मचारी वृंदांना दिले.यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आमदार संजय पुराम, सौ.सविताताई पुराम,पंचायत समिती सदस्या सौ वैशालीताई पंधरे,सौ ममताताई अंबादे, सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम,सरपंच दिलीप जुळा,पोलीस पाटील सुभाष अंबादे, मदनगोपाल नदनवार व समस्त गावकऱ्यांनी,पालक मंडळींनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्णजी टप्पे, शोभेलालजी उईके,संतोष होळी,मंगलाताई वट्टी, मोहन जुडा,सुलाखा धनुष्यबाण,केशवजी उईके, मंदाताई उईके, कैलास मडावी,जयाताई बैस, छायाताई मडावी, रशीकाताई आचले यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत





