29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक खुशीला जायचेय सनदी सेवेत

खुशीला जायचेय सनदी सेवेत

0
51

गोंदिया : इयत्ता दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण वगळून ९७.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटाकावलेल्या गोंदिया येथील सी. एम. पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी खुशी सुहास सुखदेवे हिला सनदी सेवेत जाऊन देशाची सेवा करायची आहे. तिचे वडील खासगी कंपनी मार्केटिंगचे काम करतात. त्यांचे अपार कष्ट पाहून माझ्यातील जिद्द वाढली, अवघ्या तीन महिन्यांतील मेहनतीने रंगच बदलवून टाकला, असे खुशी सुखदेवे हिने सांगितले ती गोंदियाजवळील कारंजा येथील रहिवासी आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७.६० टक्के गुण घेऊन तिने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. दहावीच्या परीक्षेला मी सुरुवातीला सहज घेतले. अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु शेवटचे तीन महिने परीक्षेला असताना माझे शिक्षक सेलोकर व प्राचार्य नितीन फुंडे यांनी सातत्याने मला मार्गदर्शन केले. त्यामुळेच मला हे यश संपादन करता आले. मला पुढे सनदी सेवेत जायचे असून, त्याची तयारी मी पुढे करणार असल्याचे खशीने सांगितले.

blank