गोंदिया-खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून मंजूर नागरी विकास निधीअंतर्गत गोंदिया शहरातील प्रभाग क्र.१३ सिव्हिल लाईन येथे प्रभुसिंग बिसेन यांच्या घरापासून ते अंतिम टोकापर्यंत रस्ता सिमेंटीकरणाचे लोकार्पण माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाला.
नागरिकांच्या मूलभूत सुविधा, शहराचा विकास आणि प्रगतीसाठी खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले.भूमिपूजन प्रसंगी राजेंद्र जैन, पिंटू माने,अशोक सहारे,महेश करियार,गुड्डू बिसेन,मुकेश मिश्रा,राजू बिसेन,तरुण बिसेन,दिलीप बिसेन,बबलू चंदनकर,देवेंद्र उके,राजेश शुक्ला,चिजाझ बिसेन, प्रेमलाल बावनथडे,बलदेव चौधरी,पावन ठाकरे सहित अन्य उपस्थित होते.





