25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ तुमसर बाजार समितीत संचालकांचा राडा;कामगारांना अश्लील शिवीगाळ

तुमसर बाजार समितीत संचालकांचा राडा;कामगारांना अश्लील शिवीगाळ

0
62

तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे हमाल कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत सभेत संचालकांनी प्रचंड गोंधळ घालून कामगारांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १३ मे बुधवार रोजी घडली. या घटनेच्या निषेधार्थ हमाल माथाडी कामगार कृती समितीने तहसील कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन पुकारले आहे.हमाल कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी बुधवारी एका विशेष सभेचे आयोजन बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. या सभेला सभापती भाऊराव तुमसरे, प्रभारी सचिव मुकुल मेश्राम यासह सर्व संचालक आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

ठिय्या आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोरून आम्ही हटणार नाही, असा पवित्रा कामगार कृती संघर्ष समितीने घेतला आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीला बाजार समितीचे संचालक मंडळ आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा वैभव चोपकर यांनी दिला आहे.

खुर्थ्यांची फेकाफेक आणि अश्लील शिवीगाळ
सदर बैठकीत गोंधळ घालत संचालकांनी टेबल आपटले, काचेचे ग्लास फोडले आणि तेथील महिला व पुरुष हमाल कामगारांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर कामगारांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला.