38.4 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता गौरेश बावणकरचा जामीन अर्ज फेटाळला

गौरेश बावणकरचा जामीन अर्ज फेटाळला

0
117

सडक अर्जुनी : महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौरेश उर्फ दिनेश यशवंत बावणकर यांचा जामीन अर्ज गोंदिया येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-2 न्यायालयाने फेटाळला आहे. शुक्रवारी (दि. 15 मे) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार परिसरात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व मजकूर प्रसारित झाल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
तक्रारीनुसार, बनावट सोशल मीडिया आयडी तयार करून महापुरुषांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता. घटनेनंतर विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी तीव्र संताप व्यक करत दोर्षीवर कठोर कारवाईची मागणी केली होती.दरम्यान, आरोपीच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अर्जदाराच्या वकिलांनी आरोपीला जामीन देण्याची मागणी केली. तर सरकारी पक्ष आणि तक्रारदाराच्या वतीने जामीनाला विरोध करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर करत तो फेटाळला.