देवरी,दि.१६:तालुक्यातील हेरपार (धमदीटोला) येथील गोमती आदिवासी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला आदिवासी वित्त व विकास विभागाचे अप्पर सचिव विजय वाघमारे (भा.प्र.से.) यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
या महत्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांच्यासोबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, शबरी आदिवासी वित्त विभागाचे प्रकल्प समन्वयक प्रफुल्ल पाटील तसेच विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.विजय वाघमारे यांनी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी शेतकन्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केल्या जाणान्या प्रयत्नांची सविस्तर माहिती घेतली. उत्पादक संस्थेचा कारभार, शेतकन्यांचा सहभाग आणि उत्पादित मालाचे विपणन यावर त्यांनी पदाधिकान्यांशी संवाद साधला. “ग्रामीण भागातील आदिवासी शेतकन्यांना संघटित करून त्यांना बाजारपेठ मिळवून देणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते





