27.7 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Top News 5 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

5 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

0
190

गडचिरोली,,दि.१६– जिल्ह्रातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्रातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच कैद झालेली आहे.त्यातच आज १६ मे रोजी 01 डिव्हीसीएम, 01 पीपीसीएम, 01 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य असे 05 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमूळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे 38 लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले होते.गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 137 माओवाद्यांनी केले आहे.

आज दिनांक 16/05/2026 रोजी सात जहाल माओवादी नामे 1) मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा (डिव्हीसीएम- कुतुल एरिया कुरिअर टीम) वय 52 वर्षे, रा. बुर्गी (पि.), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली 2) जिवन ऊर्फ जग्गु ऊर्फ भिमा देवा मडकाम (पीपीसिएम – कंपनी क्र. 07), वय 26 वर्षे, रा. तोयाम, ता. कोंटा जि. सुकमा (छ.ग.), 3) रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा (एसीएम – नेलणार टेक्नीकल टीम), वय 40 वर्षे, रा. कातुलझोरा, ता. मोहल्ला, जि. मानपुर (छ.ग.), 4) मंगली रघु कुरसाम (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 22 वर्षे रा. सवनार, ता. उसुर, जि. बिजापुर (छ.ग.), 5) लक्ष्मी डेंगा पुनेम (सदस्य स्टाफ टीम), वय 25 वर्षे, रा. शिकुरभट्टी, ता. बासागुडा, जि. बिजापुर (छ. ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकूण 171 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 पासून आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 05 माओवाद्यांसहित) एकूण 137 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., व्दितीय कमान अधिकारी 192 बटा. सिआरपीएफ नरेंद्र कुमार, उपकमांडण्ट इंट सिआरपीएफ सुमित वर्मा तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

blank