… नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत 8.40 कोटी रुपयांच्या विकास कामांचे आ.बडोले यांनी केले भूमिपूजन..
अर्जुन मोर.-शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोज एक नवा अध्याय अर्जुनी नगरपंचायत लिहीत आहे.शहराला सर्वांग सुंदर करण्यासाठी नगरसेवकांनी वज्रमुठ बांधली आहे.मूलभूत पायाभूत सुविधांनी सज्ज सुंदर नगरासाठी नगरसेवकांचा राजकीय एकोपा इतरांना मोलाचा संदेश देणारा आहे. राज्याचे महायुती सरकार भरघोस निधी उपलब्ध करून देत आहे. यामुळे सर्व सहज शक्य होत आहे. मी या भागाचा आमदार म्हणून सदैव आपल्या पाठीशी आहे.नगर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.लवकरच पाणीपुरवठा योजना आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल.स्वच्छ रस्ते, सांडपाण्याची सोय, विद्युत व्यवस्था,पिण्याचे स्वच्छ पाणी, सौंदर्यकरणाची प्रस्तावित कामे म्हणजे शहर सर्वांगीण विकासाच्या दिशेने अभूतपूर्व वाटचाल करीत असल्याचे धोतक असल्याचे प्रतिपादन आ. इंजि.राजकुमार बडोले यांनी केले.
ते नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत 8.40 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे. भूमिपूजक म्हणून बोलत होते.नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास उपाध्यक्ष ललिता टेंभरे, सभापती यशकुमार सहारे,दानेश साखरे, सपना उपवंसी, नगरसेवक संजय पवार, राधेश्याम भेंडारकर, अतुल बनसोड, सागर आरेकर, विजय कापगते, नगरसेविका ममता भय्या, इंदू लांजेवार, संध्या शहारे, शीला उईके, दिव्या पसीने, दीक्षा शहारे, सुषमा दामले आणि मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाने उपस्थित होते.
आ. बडोले पुढे म्हणाले, जनतेने निवडून दिलेल्या नवख्या नगरसेवकांकडून प्रत्येक प्रभागात विकासाची कामे पोहोचवून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा अविरत प्रयत्न सुरु आहे. सर्वांगीण विकासासोबत कामांचा दर्जा,गुणवत्ता उत्तम असावा याकरिता सर्वांनी सजग राहावे.मूलभूत सुविधा सोबत नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी नगरसेवकांनी कार्य करावे तरच शहराचा सर्वांगीण विकास साध्य करता येईल असे आवाहन केले.
यावेळी नागरी सेवा व सुविधा योजना २०२४-२५ अंतर्गत 8.40 कोटीच्या विविध प्रभागात विकास कामांचे भूमिपूजन आ.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला.सिमेंट काँक्रीट रस्ते, बंद गटारे, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक, स्वच्छता गृह,लघु पाणीपुरवठा सुविधा, वृक्ष लागवड, संरक्षण भिंती, वॉटर कुलर, सौंदर्यीकरण अश्या कामांसह एक कोटी रुपयांच्या नमो उद्यानाचा समावेश आहे.
यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार असून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि.निखिल बंड,प्रशासकीय अधिकारी दिलीप उईके, लेखापाल एकनाथ चव्हाण, सुमित मेश्राम,दीपक राऊत, दुर्योधन नेवारे,सुरेश बोरीकर, धनंजय काळबांधे, नयन शहरे, मिथुन कोचे,अरविंद लांजेवार यांनी सहकार्य केले.
भव्य नमो उद्यान होणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जन्मदिनी गतवर्षी एक कोटी रुपयांचा नमो उद्यान मंजूर केला. शहराच्या सौंदर्यकरणात भर पडावी,नागरिकांना उद्यानाचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने टीव्ही टावर परिसरात नमो उद्यान साकारला जात आहे.उत्कृष्ट उद्यानांना शासनाकडून पारितोषिक मिळणार आहे.आज आमदारांच्या हस्ते उद्यानाचे भूमिपूजन झाले.
मल उपसा मशीनचे लोकार्पण
शासनाने गटारांमधील मल उपसा करण्यासाठी मल उपसा मशीन उपलब्ध करून दिली.यापूर्वी नागरिकांना गटार सफाई करिता किरायाने मशीन मागवावी लागत होती. ती गैरसोय आता टळली.या मल उपसा मशीनचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.





