24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

0
105

महसूल नोंदीतून १.६७ हेक्टर जमीन गायब?

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा येथे एका शेतकऱ्याने महसूल नोंदीतून शेतजमीन कमी झाल्याचा आरोप करत थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. कृष्णकुमार डोये असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून, “जोपर्यंत जमीन पुन्हा रेकॉर्डवर येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

शेतकरी कृष्णकुमार डोये यांनी महसूल विभागावर गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या हक्काची सुमारे १.६७ हेक्टर शेतजमीन महसूल नोंदीतून कमी करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी महसूल विभाग, तहसील कार्यालय तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने आणि पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा निर्णय झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.डोये यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा पालेवाडा येथील जुना गट क्रमांक ३३६ अंतर्गत त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण १०.१४ हेक्टर शेतजमीन नोंद होती. सन १९८९ मध्ये संबंधित जमिनीची कायदेशीर विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार गट क्रमांक ३३६/४ आणि ३३६/५ असे भाग पाडून संबंधित कुटुंबीयांच्या नावे फेरफार नोंदी करण्यात आल्या होत्या.

तलाठी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जुना गट क्रमांक ३३६ हा नवीन गट क्रमांक ४१७ मध्ये रूपांतरित करण्यात आला. मात्र नव्या महसूल नोंदीमध्ये एकूण क्षेत्रफळ १०.१४ हेक्टरऐवजी केवळ ८.४७ हेक्टर दाखविण्यात आल्याने सुमारे १.६७ हेक्टर जमीन गायब झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने अखेर कृष्णकुमार डोये यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

blank