23.5 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ मोहर्ली आगरझरी गेट परिसरात वी केअर फाउंडेशनचा स्वच्छता अभियान

मोहर्ली आगरझरी गेट परिसरात वी केअर फाउंडेशनचा स्वच्छता अभियान

0
26

चंद्रपूर : सामाजिक संस्था We Care Foundation तर्फे दिनांक २० मे रोजी मोहर्ली येथील आगरझरी गेट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेत परिसराची साफसफाई करून नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती केली.या अभियानात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच वन विभागाचे आरएफओ – संतोष  थीपे यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.

कार्यक्रमाचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष – हिमायूं अली यांनी केले. यावेळी संस्थेचे सदस्य शहबाज शेख, हाजी अली, अर्पण कोठारे, यशराज बगीहेले, महेश गोरे, सिद्धार्थ शेगांवकर, इसरार शेख, अभिजित लिखितकर तसेच आझाद भाई यांनी उत्साहाने सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्याचे काम केले.“प्रकृती सुरक्षित तर भविष्य सुरक्षित” हा संदेश घेऊन संस्था पुढील काळातही सामाजिक व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित उपक्रम राबविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या स्वच्छता अभियानातून नागरिकांना पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

blank