23.9 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home शैक्षणिक शिष्यवृत्ती परिक्षेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा लायंस क्लब सिविलने केला सत्कार

शिष्यवृत्ती परिक्षेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा लायंस क्लब सिविलने केला सत्कार

0
33

गोंदिया,दि.२१ः- परीक्षा मंडळाच्या शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त करणा्या स्थानीय दातोरा येथील कु.यवी नितेश पाथोडे आणि कु.यशस्वी धर्मेंद्र डोये यांचा दतोरा येथील दिपक कदम यांच्या फॉर्महाउसमध्ये लायंस क्लब गोंदिया सिविलच्यावतीने सत्कार करण्यात आला.दोन्ही विद्यार्थीनींना वही,पेन, पुष्पगुच्छ देऊन क्लब अध्यक्ष भावना कदम,सचिव सुजाता बहेकार आणि कोषाध्यक्ष मंजूषा फूडे यांनी सत्कार केला.
यावेळी क्लब सदस्य आणि शाळेचे संचालक मुरलीधर माहोरे, गजेन्द्र फुडे, सुनील गढ़पाल्लीवर, भुवन बिसेन,नीलकंठ सिरसटे यांनी या दोन्ही मुलींना भविष्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.लायंस क्लब गोंदिया सिविल ग्रामीण क्षेत्रातील मूळ प्रोत्साहित करण्यासाठी असे आयोजन करीत असते असे चार्टर प्रेसिडेंट दीपक कदम यांनी सांगितले.
कार्यक्रम संचालन प्रा. किशोर पटले यांनी केले तर आभार दीपक कदम यांनी मानले.लायंस क्लब चे जवळपास 50 सदस्य उपस्थित होते.

blank