24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home गुन्हेवार्ता जमाकुडोच्या जंगलात आढळले अस्वल मृतावस्थेत

जमाकुडोच्या जंगलात आढळले अस्वल मृतावस्थेत

0
166

सालेकसा :तालुक्यातील जमाकुडो येथील शासकीय आ-श्रम शाळेच्या इमारतीमागे एक अस्वल मृतावस्थेत आढळल्याने मानागढ़ वन क्षेत्रातील जमाकुडो वनक्षेत्रात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच, वन विभागाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.
स्थानिक रहिवाशांनी वनक्षेत्रात अस्वलाचा मृतदेह असल्याची माहिती देताच मानागढ बीट राऊंड अधिकारी एस.यू.चौहान आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.वन अधिकान्यांनी घटनास्थळी पोहोचून मृत अस्वलाची तपासणी केली आणि आजूबाजूच्या परिसर ाची पाहणी केली. प्राथमिक तपासात शिकार किंवा विषप्रयोगाचा कोणताही पुरावा आढळला नाही. अधिकान्यांच्या मते, अस्वलाचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे दिसून आले.
वन विभागाने विहित कार्यपद्धतीनुसार पंचनामा तयार केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी मटकर यांनी मृत अस्वलाचे शव-विच्छेदन केले. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर, वन विभागाच्या देखरेखीखाली अस्वलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

blank