२०११ मध्ये पारा गेला होता ४७.५ अंशावर वाढत्या तापमानाने अंगाची लाही लाही
गोंदिया : मागील एक आठड्यापासून दिवसांपासून जिल्ह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, उष्णतेने गेल्या १२ वर्षातील नीचांक मोडला आहे. सन २०१४ मध्ये जिल्ह्याचे तापमान ४५.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर, तब्बल १२ वर्षांनी यंदा तापमानाचा पारा आज सोमवारला नवतपाच्या पहिल्याच दिवशी (दि.२५) थेट ४६.१ अंशावर पोहोचला आहे. या भीषण उन्हाळ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचे तीव्र आवाहन केले आहे.२४ मे रोजी हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्याचा पारा थेट ४५, तर शनिवारला ४४.९,शुक्रवारला ४४.९ तर गुरुवार(दि.२१ मे)ला ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या भीषण आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे नऊतपाला २५ मेपासून सुरुवात झाली असून कालावधीत तापमानात अधिक वाढ होत असल्याने यंदाचे तापमान सन २०११ चा ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड मोडणार का? अशी चिंता आतापासूनच जिल्हावासीयांना सतावू लागली आहे.




