25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home क्रीडा कविता राऊतचे टार्गेट वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा

कविता राऊतचे टार्गेट वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा

0
57

औरंगाबाद : महाराष्ट्राची लांब पल्ल्याची धावपटू आणि आॅलिम्पियन कविता राऊत हिचे लक्ष्य आहे ते लंडन येथे २0१७ मध्ये होणारी वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धा. आॅलिम्पिकसह राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत आपला ठसा उमटवणाऱ्या कविता राऊत औरंगाबाद येथे पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी आली होती.

रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता राऊत हिने २0१0 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १0 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून बहुमान मिळवला होता. तसेच तिने २0१0 मध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत १0 हजार मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी कामगिरीत सातत्य राखणाऱ्या कविता राऊत हिने १0 कि.मी. रोड रनिंग रेसमध्ये ३४.३२ अशी वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला होता. अर्जुन पुरस्काराने सन्मानित कविता राऊत हिने आज पत्रकारांशी संवाद साधला.