23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांचा अर्ज दाखल

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांचा अर्ज दाखल

0
309

 भंडारा,दि.०१ जून-भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या( विधानपरिषद) निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा आज (दि.१) शेवटच्या दिवशी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल पटेल,भाजपचे आमदार परिणय फुके,अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले, आ. राजूभाऊ कारेमोरे, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, माजी खासदार सुनील मेंढे, सुनील फुंडे,माजी आमदार राजेंद्र जैन,गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपस्थित होते. अविनाश ब्राम्हणकर यांचं उमेदवारी अर्ज दाखल कारण्याअगोदर भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात महायुतीच्या मतदारांची जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून महायुती उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शेकडो महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र यावेळी शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची अनुपस्थिती होती.

blank