26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढ मागे घ्या : भाकप ची निदर्शने

पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढ मागे घ्या : भाकप ची निदर्शने

0
91

गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 1 जूनला राज्यव्यापी आंदोलनाच्या आव्हानानुसार आज पक्षाच्या गोंदिया जिल्हा शाखेच्या नेतृत्वात नवीन प्रशासकीय इमारती समोर जोरदार निदर्शने आंदोलन करुण इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात सर्व कॉम्रेड्स हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, गुणवंत नाईक, सुरेश रंगारी, कल्पना डोंगरे, दुलीचंद कावडे, जितेंद्र गजभिये, राजेश वैद्य, घनश्याम गजभिये व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल भालेराव सह इत्यादी कार्यकर्ते शामिल होते.
सरकार व तेल कंपन्यानीं युद्धाची कारणे पुढे करुण निवडणूक परिणाम घोषित झाल्या नंतर लगेच पेट्रोल,डिझेल, गॅस, सीएनजी कमर्शीयल गैसच्या किंमतीत अनेक वेळा भाववाढ केली आहे. ज्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंची महागाई झापाट्याने वाढत असल्याने सर्व सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून माहंगाईचा झडा सहन करणारा शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंब त्रस्त झाला आहे.केंद्र आणि राज्य सरकारची जनविरोधी व कारपोरेट धार्जिणे धोरणा मुळे जीवन जगणे कठीण झाल्याचे पक्षाच्या निवेदनात नमूद आहे. म्हणून इंधन दरवाढ़ मागे घेणे, महंगाई वर आळा घालणे, पेट्रोल, डिझेल गैस वरील अधिभार कमी करणे शेतकऱ्यांना शेतीकामा करिता ट्रॅक्टरसाठी सवलतीच्या पुरवठा इंधन देणे , खरीफ हंगामात खताचा पुरेशा साठा करण्यास सरकार अपयशी ठरली आहे. करिता सवलतीच्या दरात खत, बियाणे, किटनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करा तसेच नीट पेपर फुटी मुळे दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे, एसटी बस मोफत प्रवासाची सवलत द्या आदी मागण्याचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्रीच्या नांवे येथील एसडीओ यांना शिष्टमंडळाच्या वतीने सादर करण्यात आले.

blank