38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक :तीन उमेदवार रिंगणात,बनसोड,अग्रवाल यांची माघार

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक :तीन उमेदवार रिंगणात,बनसोड,अग्रवाल यांची माघार

0
64

blank

भंडारा, दि. 4 जून 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.अंतिम उमेदवारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर तसेच अपक्ष उमेदवार नरेश माणिक ईश्वरकर आणि सचिन यशवंत कुंभलकर यांचा समावेश आहे.या मतदारसंघासाठी मतदान दि. 18 जून 2026 रोजी होणार असून मतमोजणी दि. 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे.

blank