34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा अमरावतीचे डॉ. सागर धनोडकर दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये धावणार

अमरावतीचे डॉ. सागर धनोडकर दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये धावणार

0
9

blank

अमरावती : अमरावतीचे प्रख्यात मॅरेथॉनपटू डॉ. सागर धनोडकर यांची दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे १४ जून २०२६ रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेसाठी (Comrades Marathon) निवड झाली असून ते या स्पर्धेत दुसऱ्यांदा भारत आणि अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अमरावती शहरातील एकमेव धावपटू म्हणून त्यांचा सहभाग निश्चित झाल्याने क्रीडाविश्वात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी, सर्वात मोठी आणि अत्यंत आव्हानात्मक अल्ट्रा मॅरेथॉन (Comrades Marathon) स्पर्धांपैकी एक मानली जाते. यंदा या स्पर्धेची ९९ वी आवृत्ती पार पडत असून ८४ देशांतील तब्बल २१,६३३ पात्र धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारतातून २७९ धावपटूंनी पात्रता मिळवली असून त्यामध्ये डॉ. सागर धनोडकर यांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी डॉ. धनोडकर (Dr. Sagar Dhanodkar) यांनी गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत नियोजनबद्ध आणि कठोर सराव केला आहे.

वैद्यकीय व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत त्यांनी सातत्याने प्रशिक्षण सुरू ठेवले. तयारीचा भाग म्हणून त्यांनी ६०, ५६, ५०, ४८, ३६, २७ आणि १८ किलोमीटर अंतरांच्या विविध आव्हानात्मक शर्यती यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच त्यांना पुन्हा एकदा या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ते १० जून रोजी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहेत

blank