38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ चारा आणण्यासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार

चारा आणण्यासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार

0
27

blank

गोरेगाव : तालुक्यातील कलपाथरी जंगल चारा परिसरात घरच्या शेळ्यांसाठी आणण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दुलेश्वर संतोष खरकाडे (वय ३१) रा. कलपाथरी, ता. गोरेगाव) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील रहिवासी दुलेश्वर खरकाडे हा नेहमीप्रमाणे गावाशेजारील कलपाथरी जंगल परिसरात आपल्या शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गेला होता. मात्र दुपारपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकरी त्याचा शोध घेण्यासाठी दुपारी कलपाथरी जंगलात परिसरात गेले. त्यांना काही अंतरावर दुलेश्वरची दुचाकी व गाडीच्या डिक्कीत मोबाइल आढळला. तर दुचाकीपासून पाचशे मीटर अंतरावर दलेश्वर मतदेह आढलला गावकऱ्यांनी लगेच या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. परिसरात वाघाच्या पावलाचे ठसे आढळले. तसेच मागील तीन चार दिवसांपासून या परिसरात एका पट्टेदार वाघाचा वावर होता. या वाघाचे गावकऱ्यांना दर्शन सुध्दा झाल्याची माहिती आहे. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

blank