38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा

0
16

blank

मेहकर– समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील पिंपरी माळी गावाजवळ सोमवारी पहाटे खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.बाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की लक्झरी बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.गेल्या एक ते दीड तासांपासून काही प्रवासी लक्झरी बसमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे.ही खाजगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना हा अपघात झाला.प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की लक्झरी बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.
गेल्या एक ते दीड तासांपासून काही प्रवासी लक्झरी बसमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

blank