35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ७२ गुन्हे नोंद

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ७२ गुन्हे नोंद

0
51

blank

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभाग, गोंदिया आणि देवरी विभाग तसेच भरारी पथकाने २९ मे २०२६ ते ४ जून २०२६ या कालावधीत तिरोडा, सुकडी, कोडेलोहारा, लेंडझरी, पांगळी, शाहरावाणी, गोंदेखारी, आसोली, गोरेगाव या भागात धाडी टाकून मोठी कारवाई केली.

या कारवाईत एकूण ७२ गुन्हे नोंदविण्यात आले. यापैकी ४५ आरोपींना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात मोहा दारू ७८३ लिटर, मोहा सडवा ३४८१० लिटर, देशी दारू ६३.८३ लिटर, विदेशी दारू ७९८ लिटर, बिअर ९ लिटर आणि ताडी ५० लिटरचा समावेश आहे. याशिवाय ३ दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १६ लाख ७ हजार ५१० रुपये असल्याची माहिती विभागाने दिली आहे.ही कारवाई अधीक्षक मनोहर अंचुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एम. जुमडे,ए.ओ. गभणे, दुय्यम निरीक्षक डी. बी. सव्वालाखे यांच्यासह २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.

blank