
तिरोडाः-एकोडी येथील प्रतिष्ठित नागरीक व भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते तिरोडा विधानसभा प्रमुख डॉ. वसंत भगत (मु. सोनेगाव) यांची नात कु. ऊर्जा मयूर भगत (७ वर्षे) हिने किओ सबजुनीअर राष्ट्रीय कराटे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.स्पर्धेत आसाम, उत्तराखंड, तामिळनाडू, बिहार राज्यातील स्पर्धाकांना मागे टाकून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत लहान वयात कु. ऊर्जाने दाखविलेली जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटी यामुळे तिने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, तिच्या या यशाबद्दल आमदार विजय रहागंडाले यांनी अभिनंदन केले आहे.




