
बुलढाणा,दि.१५ः राज्य सरकारने जाहिर केलेल्या शेतकरी कर्जमाफीत अनेक अटी शर्ती घालून कर्जमाफीवासून शेतकरी वर्गाला वंंचित ठेवण्याच्या सरकारचा डाव उधळून लावण्याकरीता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज(दि.१५)पासून सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीक विम्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला दणक्यात सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता आरपारच्या लढ्याचा एल्गार पुकारला आहे. आश्वासनांची फसवणूक, जाचक अटींची कर्जमाफी आणि पीकविम्याच्या नावाने सुरू असलेला अन्याय याविरोधात हा संघर्ष आहे.जीव गेला तरी बेहत्तर… पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असे तुपकर यांनी म्हटले आहे.




