
नागपूर,दि.१५ः आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते , चिंतनशील व्यक्तित्व ,पाली भाषा शेड्युल 8 मध्ये समाविष्ट करण्यासाठी पूर्ण ताकदीनी लढणारे, चळवळीतील आणि कुटुंबातील लोकांवर निरतिशय प्रेम करणारे डॉ सुधीर वत्सला जनार्दन भगत यांचे रविवार दि. 14 जून 2026 ला रात्री 11.30 वाजता दुःखद निधन झाले.अंत्ययात्रा त्यांचे प्लॉट नं 17, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, न्यू मानकापूर निवासस्थानाहून सोमवार दिनांक 15 जून ला सायंकाळी 4 वाजता मानकापूर मोक्षधाम करिता निघणार आहे.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठी हानी झालेली आहे.त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.




