गोंदिया,दि.१६ः झेनिथ चंद्र डोंथुला हे महाराष्ट्र केडरचे आणि २०२२ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS)२०२२ च्या तुकडीतील भाप्रसे झेनिथ चंद्रा दोन्तुला यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्री.दोन्तुला हे सध्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तथा सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे कार्यरत आहेत.सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सुभाष उमारणीकर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश आज १६ जून रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.





