40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ ‘युनिव्हर्सल फेरो’ कंपनीत ढिगाऱ्याखाली दबून तीन महिला मजूर गंभीर !

‘युनिव्हर्सल फेरो’ कंपनीत ढिगाऱ्याखाली दबून तीन महिला मजूर गंभीर !

0
26

तुमसर : तालुक्यातील माडगी येथील बंद पडलेल्या’ युनिव्हर्सल फेरो’ कंपनीच्या आवारात मंगळवार दि. १६ जून रोजी आणि मातीच्या अवाढव्य ढिगाऱ्याखाली दबून तीन महिला मजूर गंभीर जखमी नी झाल्या आहेत. या घटनेमुळे कंपनीतील ाने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त होत आहे.
नी ज बात ग्री कोर येत माडगी येथील युनिव्हर्सल कंपनी गेल्या २०-२२ वर्षांपासून बंद असली तरी, तिथे साठवून ठेवलेल्या वेस्ट मटेरियलमधून मॅगनीज काढण्याचे काम अनाधिकृतपणे सुरू असल्याचे समजते. या कामासाठी परिसरातील ३० ते ३५ मजूर रोजंदारीवर कार्यरत आहेत. मंगळवारी काम सुरू असताना अचानक माती आणि स्लॅगचा ढिगारा कोसळला. यात कांचन सेलोकर (५०), चंद्रकला टिचकुले (५२) आणि सुमन वहिले (५५) या तिन महिला दबल्या गेल्या.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मजुरांना बाहेर काढले. तिन्ही महिलांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी हलविण्यात आले. मात्र, कांचन सेलोकर आणि चंद्रकला टिचकुले यांच्या दुखापती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी भंडारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर सुमन वहिले यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.मजुरांना कोणतेही हेल्मेट, ग्लोव्हज किंवा सेफ्टी किट न देता जीवघेण्या कामाला जुंपले जाते. दुसरीकडे, कामगारांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पन्नास वर्षांपासूनच्या या साठवणुकीकडे आणि तिथे सुरू असलेल्या धोकादायक कामाकडे प्रशासन का डोळेझाक करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.या घटनेने कामगार विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या या उद्योगावर कारवाई कधी होणार? आणि मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.